Ad will apear here
Next
सावरकरांवरील ‘हे मृत्युंजय’ नाटकाचा मे महिन्यात रत्नागिरीत प्रयोग
रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमान शिक्षेच्या कालावधीवर आधारित असलेल्या ‘हे मृत्युंजय’ या नाटकाचा प्रयोग मे महिन्यात रत्नागिरीत होणार आहे. नाटकाच्या तिकिटांची विक्री होणार नसून, नाटक पाहिल्यावर प्रेक्षकांनी स्वेच्छामूल्य द्यायचे आहे. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे राज्यभर या नाटकाचे प्रयोग होत असून, आता रत्नागिरीतही त्याचा प्रयोग होणार आहे. सावरकर स्मारकाचे विश्वस्त सुनील वालावलकर यांनी रत्नागिरीत पतित पावन मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

वालावलकर म्हणाले, ‘आतापर्यंत या नाटकाचे ६० प्रयोग झाले आहेत. सावरकरांना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. तेथील सेल्युलर जेलमध्ये त्यांनी ती शिक्षा भोगली. प्रचंड हाल त्यांनी सहन केले. ११ वर्षे ते तेथे होते. अनेक क्रांतिवीरांनी हे हाल सोसले आहेत. या सगळ्या घटनांचे दर्शन या नाटकातून घडते. ९० वर्षे झगडल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य  मिळाले आहे, याची जाणीव सगळ्यांना व्हावी, स्वातंत्र्याचे मूल्य कळावे, या हेतूने हे नाटक दाखविले जात आहे. युवा पिढीने हे स्वातंत्र्य जपावे, टिकवावे आणि पुढे न्यावे, अशी इच्छा आहे.’

हे नाटक पाहण्यासाठी तिकिटे विकली जात नाहीत. नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी स्वेच्छामूल्य म्हणून आपल्याला वाटेल तेवढी रक्कम द्यावी, अशी पद्धत राबविली असल्याचे वालावलकर यांनी सांगितले. 



सुनील वालावलकररत्नागिरीतील प्रयोग मे महिन्यात होणार हे निश्चित झाले असले, तरी त्याची तारीख अद्याप ठरलेली नाही; मात्र तो मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात होणार आहे, असे वालावलकर म्हणाले. लहान मुले, तरुणांसह सर्वांनीच हे नाटक आवर्जून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले. 

या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. वेशभूषेची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले असून, देवदत्त बाजी यांचे पार्श्वसंगीत आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे यांनी सांभाळली आहे. अजिंक्य ननावरे, संदीप सोमण, जयेंद्र मोरे, सुयश पुरोहित, शार्दूल आपटे, बिपीन सुर्वे, नितीन वाघ, विशाख म्हामणकर, केतन पाडळकर, योगेश दळवी, मधुसूदन सोनावणे आदी कलाकारांनी यात भूमिका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि अनामिका यांनी या नाटकाची निर्मिती केली असून, ‘साईसाक्षी’ने ते प्रकाशित केले आहे. 



हेही जरूर वाचा :






सावरकरांची ई-बुक्स मोफत :
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. बुकगंगाच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही ती डाउनलोड करता येतील.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZSNBZ
Similar Posts
स्वा. सावरकरांवरील ‘हे मृत्युंजय’ नाटकाचा १६ मे रोजी रत्नागिरीत प्रयोग रत्नागिरी : भाषाशुद्धीपासून स्वातंत्र्यलढ्यापर्यंत अनेक क्षेत्रांत अद्वितीय कामगिरी केलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या अंदमानमधील शिक्षेच्या कालावधीवर आधारित असलेल्या ‘हे मृत्युंजय’ या नाटकाचा प्रयोग १६ मे रोजी रत्नागिरीत म्हणजेच स्वातंत्र्यवीरांच्या कर्मभूमीत होणार आहे
सावरकर जयंतीला त्यांच्या नातीचा रत्नागिरीत विशेष कार्यक्रम रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची नात शाहीर विनता जोशी यांचा ‘नमन वीरतेला’ हा विशेष कार्यक्रम सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. २८ मे रोजी सायंकाळी पाच वाजता रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे.
सावरकरांची नात म्हणून लंडनमध्ये तिरंगा फडकवताना अभिमान वाटला रत्नागिरी : ‘ज्या ब्रिटिशांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अनन्वित अत्याचार केले, त्याच ब्रिटिशांच्या लंडनमध्ये सावरकरांची नात म्हणून भारताचा तिरंगा फडकवण्याचे भाग्य मला गेल्या वर्षी लाभले. त्या वेळी ऊर अभिमानाने भरून आला होता,’ अशा शब्दांत शाहीर विनता जोशी यांनी सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीत आपल्या भावना व्यक्त केल्या
अंदमान-निकोबारला पर्यावरणपूरक सुविधांची भेट पोर्ट ब्लेअर : रमणीय समुद्रकिनारे, स्वच्छ, शुद्ध हवा,पाणी अशा निसर्गसंपन्न अंदमान-निकोबार बेटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणपूरक सोयीसुविधा देणाऱ्या विविध विकास योजनांची पायाभरणी रविवारी, ३० डिसेंबर २०१८ रोजी केली; तसेच अंदमान-निकोबार बेटांवरील रॉस, नील आणि हॅवलॉक या द्वीपांची नावे बदलण्याची घोषणाही केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language